डिबेंचर कपातीच्या विरोधात एकदिवसीय उपोषण आंदोलन
schedule10 Oct 25 person by visibility 17 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने केलेल्या डिबेंचर कपातीच्या विरोधात दूध उत्पादक संघटना प्रतिनधी व प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर २०२५) एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत आंदोलन झाले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता. ‘डिंबेचरची रक्कम परत मिळालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही.’अशा घोषणा देण्यात आल्या. डिबेंचरच्या माध्यमातून एकूण ७२ कोटी रुपयांची कपात केली असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. आंदोलनात जोतिराम घोडके, अॅड. माणिक शिंदे, बाळासाहेब पाटील, चंद्रशेखर म्हस्के, पांडूरंग हिर्डेकर, मधुकर पाटील, पांडूरंग मगदूम, के. बी. खुटाळे आदींचा समावेश होता.