जिप- पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी विशेष सभा
schedule10 Oct 25 person by visibility 147 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील बारा पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता 13 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष सभा आयोजित केल्या आहेत.
जिल्हा परिषद कोल्हापूर (जि.प. निवडणूक विभाग)- ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती निर्णायक गणासाठी पंचायत समिती सभागृह, शाहुवाडी, नगरपालिका मयुरबाग हॉल, पन्हाळा, तहसिल कार्यालय हातकणंगले, पहिला मजला, मिटींग हॉल, ता. हातकणंगले, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, पहिला मजला, तहसिल कार्यालय, शिरोळ, बहुउद्देशीय सभागृह, कागल, शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा, करवीर, तहसिलदार यांचे दालन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, गगनबावडा, राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती राधानगरी, आम. दिनकरराव जाधव सभागृह, पंचायत समिती भुदरगड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह आजरा, महसूल भवन, गडहिंग्लज, ऑडीटोरियम हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चंदगड या सर्व ठिकाणी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सभा होणार असून जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमुद केलेल्या ठिकाणी व वेळेत हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.