Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वेळेत कुलगुरुंची नियुक्ती न करणे हा विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा प्रकाररणजितसिंह पाटील, राजेखान जमादारांचा राष्ट्रवादीत प्रवेश ! मुश्रीफांचा प्रविणसिंह पाटलांना सल्ला, दिल्या घरी सुखी राहा !!विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? सतेज पाटलांचा सवालइंडिया आघाडीतर्फे  १३ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाअन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्टचा इशारामहिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा स्मार्ट बझर विकसिततरुणीशी अश्लिल वर्तन प्रकरण, चौकशीसाठी विशाखा समितीकडे ! कार्यालयीन अधीक्षकालाही नोटीस !!पूरग्रस्तांसाठी शाहू शिक्षक आघाडी सरसावली, लाखाचा निधी जमविला !ग्रंथालये ग्रंथांचे घर नव्हे तर वाचन मंदिरे व्हावीत – प्राचार्य जी. पी. माळीअतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा कोटीहून अधिक निधी प्राप्त – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? सतेज पाटलांचा सवाल

schedule09 Oct 25 person by visibility 66 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का?’असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून शिक्षण क्षेत्रासाठी हे भूषणावह नाही. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला असतानाही ९ ऑक्टोबरपर्यंत नवीन प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली नसल्याने आमदार पाटील यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

 शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.  शिक्षणाबाबतची ही अनास्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांप्रती अन्याय आहे. ज्या दिवशी कुलगुरूंची निवड होते, त्याच दिवशी त्यांच्या कार्यकाळाची समाप्ती तारीख ठरलेली असते. मग वेळेवर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया का झाली नाही? आणि किमान प्रभारी कुलगुरूसुद्धा का नेमण्यात आले नाहीत? या सर्व परिस्थितीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्यपाल कार्यालय व उच्च शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा?” असा उद्विग्न सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes