शिक्षणतज्ञ डी बी पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मंगळवारी
schedule10 Oct 25 person by visibility 84 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे माजी चेअरमन स्वर्गीय डी. बी. पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी होत आहे. न्यू कॉलेज येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये विजेत्यांना एकूण 25000 रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील व संस्थेचे संचालक विनय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
न्यू कॉलेज व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ मा. डी. बी. पाटील व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी, " ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी बी पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचे भारत- अमेरिका संबंधावर होणारे परिणाम, कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी आणि आव्हाने, आरक्षण : सामाजिक न्यायाचे साधन की राजकारण ?, संविधानाचा अमृत महोत्सव : सिंहावलोकन, भौतिक सुखाचा ध्यास आणि पर्यावरणाचा ऱ्हास " हे विषय आहेत.
ही स्पर्धा फक्त वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यापुरतेच मर्यादित आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना दहा हजार रुपये व चषक. द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला 5000 रुपये व चषक , चतुर्थ क्रमांक विजेत्याला दोन हजार रुपये चषक तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी एक हजार रुपयांची दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी दोनशे रुपये व तत्काळ नोंदणी 250 रुपये इतकी आहे . स्पर्धेसाठी नाव नोंदणी व फी ऑनलाईन भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या समन्वयक प्रा. डॉ. कविता गगराणी 97 64 46 99 08 व प्रा अविनाश पाटील 96 89 64 62 48 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे चेअरमन के जी पाटील यश हे अध्यक्षस्थानी असतील. तर पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे व्हाईस चेअरमन डी.जी. किल्लेदार तर संस्थेचे खजानिस वाय.एस. चव्हाण हे अध्यक्षस्थानी असतील. पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
पत्रकार परिषदेला कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. रघुनाथ ढमकले, प्रा. डॉ.कविता गगराणी, प्रा. अविनाश पाटील, प्रा. डॉ. मनीषा नाईकवडी, प्रा. उमा गायकवाड, प्रा. प्रतीक चेंडूत, प्रा. सागर देशमुख. प्रा. संग्राम पाटील आदी उपस्थित होते