इंडिया आघाडीतर्फे १३ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
schedule09 Oct 25 person by visibility 37 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा. यासाठी लढणारे सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीन १३ऑक्टोंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावल निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत भाजप सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. मोदी सरकारची हुकूमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया बैठकीत उमटली.यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांची भाषणे झाली. दसरा चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, डी. जी भास्कर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, अनिल घाटगे, अभिजीत कांबळे, बाबुराव कदम, भारती पोवार, चंद्रकांत जाधव, सम्राट मोरे, सुभाष देसाई, विजय सूर्यवंशी, सुजय पोतदार, सुनिल देसाई, दिग्वीजय मगदूम, भरत रसाळे, मोहन सालपे आदी उपस्थित होते