Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वेळेत कुलगुरुंची नियुक्ती न करणे हा विद्यापीठाची गरिमा घालविण्याचा प्रकाररणजितसिंह पाटील, राजेखान जमादारांचा राष्ट्रवादीत प्रवेश ! मुश्रीफांचा प्रविणसिंह पाटलांना सल्ला, दिल्या घरी सुखी राहा !!विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? सतेज पाटलांचा सवालइंडिया आघाडीतर्फे  १३ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाअन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्टचा इशारामहिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा स्मार्ट बझर विकसिततरुणीशी अश्लिल वर्तन प्रकरण, चौकशीसाठी विशाखा समितीकडे ! कार्यालयीन अधीक्षकालाही नोटीस !!पूरग्रस्तांसाठी शाहू शिक्षक आघाडी सरसावली, लाखाचा निधी जमविला !ग्रंथालये ग्रंथांचे घर नव्हे तर वाचन मंदिरे व्हावीत – प्राचार्य जी. पी. माळीअतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा कोटीहून अधिक निधी प्राप्त – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

महिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा स्मार्ट बझर विकसित

schedule09 Oct 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या या संशोधकांनी महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग  प्रारंभिक टप्प्यातच ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘स्मार्ट बझर’ नावाचे अभिनव उपकरण विकसित केले. हे संशोधन महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे.

विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी स्टडीजच्या स्टेम सेल आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन तसेच मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रा. अर्पिता पांडे तिवारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थी  प्रणोती कांबळे आणि सोहेल शेख यांनी हे अत्याधुनिक उपकरण तयार केले आहे. या सर्वाना रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

   या ‘स्मार्ट बझर’मध्ये एआय तंत्रज्ञानासोबत कार्बन क्वांटम डॉट्स या नॅनोमटेरियल्सचा वापर केला आहे. शरीरातील जैविक द्रवांमधील सूक्ष्म बदल ओळखून हे उपकरण संभाव्य कर्करोगाचे संकेत काही सेकंदांत शोधते. पारंपरिक तपासणी पद्धतींपेक्षा हे साधन अधिक वेगवान, संवेदनशील आणि तुलनेने कमी परवडणारे आहे. या उपकरणाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते मोबाइल अॅप किंवा इतर स्मार्ट डिव्हाइसशी सहज जोडता येते. महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान हे साधन काही क्षणांत बायोसिग्नल्सचे विश्लेषण करून कर्करोगाची लवकर सूचना देते. त्यामुळे कर्करोगाचा प्रारंभिक टप्प्यातच शोध घेऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतात, ज्यामुळे मृत्यूदरात घट घडवून आणणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात उद्योग सहकार्य आणि क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. प्रा. अर्पिता तिवारी म्हणाल्या, महिलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान होणे हे मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे. आमचे उद्दिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन देणे हेच आहे. महिलांच्या आरोग्यरक्षणासाठी एक नवे पाऊल ठरेल.  कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील,  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes