अन्यथा महानगरपालिकेवर फौजदारी : कोल्हापूर नेक्स्टचा इशारा
schedule09 Oct 25 person by visibility 69 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारंवार घडणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीचा घटनांबाबत जबाबदार कर्मचाऱ्यांवर एक आठवड्याच्या आत कारवाई करा अन्यथा महानगरपालिके विरोधात फौजदारी दाखल करू असा इशारा कोल्हापूर नेक्स्ट च्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना दिला. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर उपस्थित होते.
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळील ब्रम्हेश्वर बाग परिसरामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तीन झाडांची तोड केली. या संदर्भात उद्यान विभागाच्या कर्मचारी -अधिका ऱ्यांना विचारणा करण्याकरता संपर्क साधला असता, कोणीही उत्तर दिले नाही. हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्यान अधीक्षकांनी तेथील दोन झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगितले. दोन झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या छाटणीची परवानगी असताना तीन झाडे केवळ बुंधा ठेवून सरसकट कापली गेली. त्या ठिकाणी उद्यान अधीक्षकांनी येणे अपेक्षित असताना ते आले नाहीत. संबंधितावर एक आठवड्यात कारवाई न झाल्यास महानगरपालिकेवर फौजदारी करू असाही इशारा शिष्टमंडळाने दिला. यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश उद्यान अधीक्षकांना दिले तसेच याबाबत कार्यवाही करण्यासाठी अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी संघटनेचे चंद्रकांत चव्हाण, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, विजयसिंह खाडे पाटील, स्वाती कदम, ओंकार गोसावी, तसेच उपस्थित होते.
……………………