+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविश्‍वराज महाडिकांच्या विवाहनिमित्त शाही स्वागत सोहळा adjustराज्य निवड महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड adjustमहावितरणच्या जनमित्रांना सुरक्षेचे धडे adjustएटी स्पोर्ट्स ठरला लिंगायत प्रीमिअर लीग विजेता adjustशहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सवर दंडात्मक कारवाई ! जैव वैद्यकीय कचऱ्याप्रश्नी महापालिकेचा डोस !! adjust तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन ! तुर्कीतील परिषदेत करणार संबोधन adjust विद्यापीठात कलर अवार्ड उत्साहात, न्यू कॉलेजला नागेशकर ट्रॉफी ! adjustकोल्हापुरात रंगला ४३४ मुलांचा जन्मोत्सव, पत्की हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन adjustमहात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात केल्यास आयुष्यात बदल adjustटेनिस स्पर्धेत यश पटेल, नीव गोगिया, प्रार्थना खेडकर, रिशिता पाटील यांचा मुख्य फेरीत
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule09 May 24 person by visibility 67 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :
गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे आठ व नऊ मे रोजी दोन दिवसीय शिबिर  झाले.  यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खत, सुक्या कचऱ्यापासून शोभेच्या वस्तू, कोकेडमा, नारळाच्या करवंटीपासून प्लांटर, पर्यावरणपूरक गिफ्ट पैकिंग,सीड बॉल्स याची माहिती व प्रात्यक्षिक शिकविले.
कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर कुडित्रेच्या पुढे आडूर गावातून थोडे आत डोंगरावर वाघजाई देवीचे मंदिर व पठार आहे . त्याठिकाणी निसर्ग सहल आयोजित केली होती.  अभय कोटणीस यांनी सहलीचे नियोजन केले होते. जोतिराम पाटील या स्थानिक स्वयंसेवकांनी तिथली पूर्ण सहल घडवली, ज्यामध्ये पुरातन विहीर, वाघजाई पठार, देवीचे मंदिर, दाखवले.
ते या ठिकाणी प्रत्यक्ष झाडे लावण्याचे व जगविण्याचे काम करतात. सर्व मुलांनी हि आज तिथल्या विहिरीतले पाणी कॅन मधून नेऊन झाडांना घातले.
निसर्गतज्ञ् परितोष उरुकुडे यांनी दुर्मिळ झाडांबद्दल माहिती दिली. मुलांनी पळस, गोता , हिरडा, बेहडा, वाघाडी , काटेसावर, तेरडा, बर्ड चेरी, तामण, करंज, वड , पिंपळ झाडे बघितली आणि अनेक प्रकारच्या बिया देखील गोळा केल्या. 
शिबीर होण्यासाठी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगांवकर , सचिव सुप्रिया भस्मे, 
शिबिराची मुख्य समन्वयक प्राजक्ता चरणे यांनी परिश्रम घेतले तर , सह सचिव शैला निकम, रेणुका वाधवानी , रोहिणी पाटील, स्मिता देशमुख ,कृपेश हिरेमठ, धनश्री अंतुरकर, जिया झंवर , वर्षा वायचळ यांनी मोलाची साथ दिली.