+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का adjustविश्‍वराज महाडिकांच्या विवाहनिमित्त शाही स्वागत सोहळा adjustराज्य निवड महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड adjustमहावितरणच्या जनमित्रांना सुरक्षेचे धडे adjustएटी स्पोर्ट्स ठरला लिंगायत प्रीमिअर लीग विजेता adjustशहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सवर दंडात्मक कारवाई ! जैव वैद्यकीय कचऱ्याप्रश्नी महापालिकेचा डोस !! adjust तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन ! तुर्कीतील परिषदेत करणार संबोधन adjust विद्यापीठात कलर अवार्ड उत्साहात, न्यू कॉलेजला नागेशकर ट्रॉफी ! adjustकोल्हापुरात रंगला ४३४ मुलांचा जन्मोत्सव, पत्की हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन adjustमहात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात केल्यास आयुष्यात बदल
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule09 May 24 person by visibility 712 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयात केआयटी आयआरएफ ही ना नफा ना तोटा या हेतूने सेक्शन ८ अंतर्गत नोंदणीकृत केलेली कंपनी आहे. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या निधी आयटीबीआय अंतर्गत परिसरातील विविध नवोद्योजकांकडून आर्थिक मदतीसाठी विविध प्रस्ताव मागितलेले होते.
एकूण प्रस्तावांपैकी १० प्रस्तावांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ५० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये इरॉक्स अनिकेत राजाराम वाळके ६ लाख, सिविड कल्टिवेशन रिषभ मल्होत्रा आणि निनाद जाधव ४ लाख, हेल्थ लिंक कॉप्यानियन श्रीमती मालन शिरगुपीकर आणि दिव्याराणी ५ लाख, एफआरपी प्रोफाइल्स अमोल कलगोंडा पाटील ६ लाख, डिबलर टाईप फर्टीलायझेशन मशीन संग्राम विकास पाटील ३ लाख, बॉयलर बर्ड्स हार्वेस्टिंग मशीन सौरभ भोसले ५ लाख, सलिव्हा सेंटीनल श्रुतिका दळवी २.५ लाख, अपारंपारिक पीएनपी अविनाश मानसिंग पुढाले ५ लाख, सिल्वर सोल्डरिंग मशीन श्रेयस कुलकर्णी ४.५ लाख, सोलर स्मार्ट ई-युनीरल सिस्टीम विनायक तातोबा कुंभार ५ लाख, राखीव निधी - ४ लाख यांचा समावेश आहे.
या सर्व प्रक्रियेला संस्थेचे अध्यक्ष  सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष  साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांचे प्रोत्साहन मिळाले.भारताच्या विकासासाठी परिसरातील नवोद्योजकांच्या स्टार्टप्सना भविष्यातही केआयटी आय.आर.एफ. योग्य त्या प्रकारचे आर्थिक,तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
केआयटी आय.आर.एफ. चे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधीर आरळी, इंक्युबॅशन मॅनेजर  देवेंद्र पाठक, इंक्युबॅशन असोसिएट पार्थ हजारे व  अंजोरी कुंभोजे यांनी या सर्व प्रक्रियेसाठी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले.