राजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर, जय शिवराय तरुण मंडळातर्फे तांत्रिक देखावा
schedule01 Sep 24 person by visibility 438 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजारामपुरीतील जय शिवराय तरुण मंडळ हे तांत्रिक दंखाव्यासाठी प्रसिद्ध. यंदाही मंडळाने तांत्रिक देखाव्याची खासियत जपलीआहे. यावर्षी मंडळातर्फे माता गौरीचा रुद्रावतार हा तांत्रिक देखावा आकर्षण ठरणार आहे.या देखाव्याच्या माध्यमातून यंदा स्त्री शक्तीचा जागर होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
गेले आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू असून यंदाच्या वर्षी भारतातील हायड्रोलिक च्या साह्याने हालत्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असणारे केरळ मधील श्री कुमार राजीव व त्यांच्या टीम यंदा मंडळाचा देखावा साकारत आहे.या देखाव्यात माता गौरी आपल्यासाठी विनायक हा गण तयार करून व स्नानापूर्वी त्याला महालाच्या प्रवेशद्वारावर उभा करून माता गौरी स्नानाला जाते विनायक आपल्या मातेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दरवाज्याजवळ उभा राहतो इतक्याच समोरून महादेव येतात व त्यांना विनायक आडवतो यावेळी महादेव क्रोधित होऊन विनायकाचा शिरच्छेद करतात.
विनायकाच्या आवाजाने माता गौरी महालाबाहेर येऊन पाहते तर विनायकाचा शिरच्छेद झालेला असतो विनायकाच्या पुनजिर्वितासाठी माता गौरी महादेवाकडे विनंती करते पण महादेव ते नाकारतात याचवेळी देवी रुद्रवतार धारण करते हायड्रोलिक च्या साह्याने सोळा फूट उंचीची रुद्रावतार धारण केलेली माता गौरी पृथ्वीच्या विनाश करणार असे सांगते यावेळी तेथे ब्रह्मदेव अवतरतात व महादेवांना विनायकाच्या पुनर्जीवित कसे करायचे हे सांगतात महादेवाच्या आदेशाने नंदी हत्तीचे मस्तक घेऊन येतो व महादेव विनायकाला हत्तीचे मस्त लावतात व विनायकला पुनर्जीवित करतात विनायकाला पुनर्जीवित झालेले बघून क्रोधित झालेली माता गौरी शांत होते व सर्व देवगण विनायकास आशीर्वाद देतात असा हा देखावा सात मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार असून आत्ता पासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोड काम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत देखाव्याचे आकर्षण असणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष धनराज माने उपाध्यक्ष तेजस जगताप व विनीत कागले यांनी सांगितले.