एक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसार
schedule20 Dec 24 person by visibility 71 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सातारा-कोल्हापूर डेमू ही एक जानेवारी २०२५ पासून नव्या वेळेत धावणर आहे. या डेमू गाडीचा क्रमांक ७१४२३ असा आहे. ही डेमू साताराहून पहाटे पाच वाजून वीस मिनिटाला सुटेल. कराड येथे सहा वाजून २५ मिनिटाला पोहोचेल. किर्लोस्करवाडी येथे सकाळी सात वाजता, तर मिरज जंक्शन येथे सकाळी आठ वाजून आठ मिनिटाला दाखल होईल. मिरजमधून आठ वाजून दहा मिनिटाला सुटेल. कोल्हापुरात ही ९.३० वाजता पोहोचेल. तरी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी (कोल्हापूर) किशोर भोरावत (मिरज) गोपाल तिवारी (कराड) व विनित पाटील (सातारा) तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.