एसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबित
schedule20 Dec 24 person by visibility 154 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गांधीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव, पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे आणि पोलिस काँन्स्टेबल संतोष कांबळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी, (२० डिसेंबर २०२४) सायंकाळी ही कारवाई केली. गुन्ह्यात जप्त केलेली मोटार परत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक शिरगिरे व काँन्स्टेबल कांबळे यांच्यावर कारवाई केली होती. लाच मागितल्याचे निष्पण्ण होत असल्यावरुन या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुरुवारी या तिघांवर लाचप्रकरणी कारवाई केली होती.