जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस
schedule21 Dec 24 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस ग्रामपंचायती अतंर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा खर्च कमी झाला आहे. यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. या कारणास्तव संबंधित ग्रामपंचायतीच्या चाळीस ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील ग्रामसेवकांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या आदेशाने या नोटीसा काढल्या आहेत. संबंधितांकडून सात दिवसात खुलासा मागविला आहे. केंद्र सरकारकडून ग्रामविकासासाठी थेट निधी दिला जातो. पंधराव्या वित्त आयोगाची मुदत मार्च २०२५ पर्यंत आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीमार्फत वित्त आयोगाचा निधी कमी प्रमाणात विकासकामावर खर्च झाला आहे.