Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंद्रकांत पाटील उच्च-तंत्रशिक्षणमंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री ! मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षणज्ञानेश्वर मुळे, विठ्ठलराव याळगींना पुरस्कार ! रविवारी वितरण समारंभ !!डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुक

जाहिरात

 

मुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाही

schedule21 Dec 24 person by visibility 73 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर कोल्हापुरात पहिल्यांदाच आगमन झाल्यावर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांची शहरातून जल्लोषी मिरवणूक निघाली. दरम्यान मिरवणुकीला प्रारंभ होण्याअगोदर दोन्ही मंत्र्यांनी, करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत बोलताना कोल्हापूर जिल्हयाच्या विकासाला गती देऊ अशी ग्वाही दिली.

मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर यांनी शनिवारी सकाळी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मंदिरात देवस्थान समितीच्यावतीने शाल, श्रीफळ व देवीची साडी देऊन स्वागत केले. यावेळी  देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी खासदार संजय मंडलिक, उसेद मुश्रीफ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  जिल्ह्यातील अपूर्ण सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त करुन हाती घेतलेले प्रत्येक कार्य प्रामाणिकपणे पार पाडणार असून त्यात यश मिळो.”
मंत्री आबिटकर म्हणाले, ‘सर्वांना सोबत घेऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कोल्हापूरचा विकास गतीने साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच "कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदारीने योगदान देऊन मिळालेल्या संधीचं सोनं करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.
  काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.”

दरम्यान मंत्री आबिटकर व मुश्रीफ यांची कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी चौक ते दसरा चौक अशी जल्लोषी मिरवणूक निघाली. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. मोटारसायकल रॅली निघाली. हाराफुलांची सजावट केलेल्या वाहनात दोन्ही मंत्री व महायुतीचे नेते मंडळी होते. शहरातील महापुरुषांच्या पुतळयांना हार अर्पण करुन अभिवादन केले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes