विवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभ
schedule21 Dec 24 person by visibility 64 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नावांनी विवेकानंद कॉलेजने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती’ हा समारंभ मंगळवारी, (२४ डिसेंबर २०२४) संस्थेच्या स्मृतिभवन येथे होणार आहे. कॉलेजमधील अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृती रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ( मुंबई ) उपस्थित राहणार आहेत. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, परीक्षा विभागाचे सी.ओ.ई. डॉ.जी.जे.नवाथे आणि महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.बी.जोग यांनी केले आहे.