दोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून सत्कार
schedule21 Dec 24 person by visibility 65 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नागपूर अधिवेशनाहून मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर हे शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. डोंगळे कुटुंबिंयातर्फे दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता, त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आबिटकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळविणे सुकर झाले. कागल व करवीरमध्येही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
मंत्री मुश्रीफ व आबिटकर यांचे कोल्हापूरमध्ये आगमन होताच त्यांनी डोंगळे यांच्या घरी भेट दिलीं.यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी यूवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक डोंगळे, पी.जी.शिंदे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, बी.आर.पाटील, यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.