Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चंद्रकांत पाटील उच्च-तंत्रशिक्षणमंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री ! मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षणज्ञानेश्वर मुळे, विठ्ठलराव याळगींना पुरस्कार ! रविवारी वितरण समारंभ !!डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुक

जाहिरात

 

भाजप

schedule08 Jan 22 person by visibility 126 category

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटी बद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने मशाल मोर्चा : सर्व संबंधितांवर कडक कारवाईची मागणी

कोल्हापूर दि.७ दिनांक ५ रोजी पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. या एकाच ठिकाणी पंतप्रधान मोदीजी यांना वीस मिनिटे थांबावे लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबतच्या या अतिशय गंभीर त्रुटीचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मशाल मोर्चा काढण्यात आला.

बिंदू चौक येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन मशाल प्रज्वलित करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला याप्रसंगी ‘पंजाब सरकार हाय हाय’, ‘पंजाब काँग्रेस हाय हाय’, ‘प्रभू श्री राम की कृपासे गूंज रहा है नाम,,मोदी मोदी जय श्री राम!!, ‘प्रधानमंत्रीजी का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘मुर्दाबाद मुर्दाबाद चन्नी चवन्नी सरकार मुर्दाबाद’, ‘वो देश नही झुकने देगा हम उसे नही झुकने देंगे’ ‘वंदे मातरम’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा आशयाचे फलक दर्शवण्यात आले. यानंतर बिंदू चौक पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी येत सर्वांनी मशाल, मेणबत्ती हाती घेत निषेध नोंदवला.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहेत. देशाच्या कणखर पंतप्रधानांमुळे जगामध्ये भारत देशाला महत्व वाढले असताना विरोधक मात्र अशा सक्षम नेत्याला विरोध करताना दिसत आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, हितेंद्र पटेल, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राउत, सुनिता सूर्यवंशी, कोमल देसाई, डॉ सदानंद राजवर्धन, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, भरत काळे, सुधीर देसाई, अशोक लोहार, बापू राणे, अभिजित शिंदे, प्रीतम यादव, विवेक वोरा, गिरीष साळोखे, सिद्धांत भेंडवडे, सुनील पाटील, मानसिंग पाटील, महेश यादव, धीरज पाटील, अप्पा लाडप्रवीण शिंदे, उत्तर भारतीय मोर्चाचे सर्व पदाधिकारी, दिलीप बोंद्रे, दत्ता लोखंडे, मामा कोळवणकर, किशोर जाधव, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया प्रसिद्धीसाठी, आपला



मा.संपादकसो, शंतनू मोहिते
दै. भाजपा कार्यालय प्रमुख

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes