राहुल आवाडेंची मागणी अन् अमित शहांची ग्वाही
schedule08 Nov 24 person by visibility 80 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये इचलकरंजी येथे झालेल्या विजयी संकल्प सभेत महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी इचकरंजी व वस्त्रोद्योगांशी निगडीत मोठा प्रकल्प् मंजूर करावा अशी मागणी केली. त्यांच्या भाषणातील मुद्यांना उजाळा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ‘कापड उद्योगाला चालना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात टेक्सटाइल पार्क उभारू. कापड निर्मितीच्या सगळया प्रक्रिया त्या ठिकाणी होतील ’अशी ग्वाही दिली.
इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहाच्या चौकात शुक्रवारी सायंकाळी ही सभा झाली. महायुतीच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उमेदवार राहुल आवाडे व हातकणंगलेचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.
या सभेत बोलताना उमेदवार राहुल आवाडे म्हणाले, ‘ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हहाळवणरक, आमदार प्रकाश आवाडे व महायुतीच्या नेते मंडळीनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर विश्वास दाखविला. उमेदवारी दिली. इचलकरंजी ही वस्त्रोद्योगनगरी आहे.. यंत्रमागधारकांचे चक्र चांगले चालले तर इचकरंजी व्यवस्थित राहते.
मंत्री शहा यांच्याकडे सहकार खाते आहे. वस्त्रोद्योगाला आणखी चालना देण्यासाठी यंत्रमागधारकांसाठी चांगल्या योजना आखाव्या लागतील. निश्चितच मंत्री शहा हे वस्त्रोद्योगसाठी योजना देतील. शिवाय पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आपण संधी दिलात. येत्या काळात सर्वसामान्य माणूस, महिला, तरुण वर्ग, शेतकरी, कामगार अशा सगळया घटकासाठी विकासात्मक कार्यक्रम राबवू. भाजप व महायुती भक्कम करू.’असेही राहुल आवाडे म्हणाले.