+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Apr 24 person by visibility 140 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " डॉ. आय सी शेख यांनी अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्यातील माणूसपण हरवून दिलं नाही, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. राम गणेश गडकरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.आय.सी .शेख यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लवटे बोलत होते . शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सीमा येवले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होत्या.
   मानपत्र , गौरव चिन्ह , कोल्हापुरी फेटा , शाल व श्रीफळ देऊन डॉ. आय.सी. शेख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सीमा येवले म्हणाल्या , " कामातील निर्दोष, निटनेटकेपणा व संयम या त्रिसूत्रीमुळे डॉ.आय.सी. शेख आपल्या  ३५ वर्षाच्या सेवेमध्ये चांगला शिक्षक व अधिकारी म्हणून काम करू शकले.शिक्षक व अधिकाऱ्यांनी आपल्या कामात या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे "
 डॉ. आय.सी .शेख म्हणाले , " छत्रपती शाहू महाराजच्या नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे भाग्य मला लाभले व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या शासकीय पातळी अव्वल ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. " 
  गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.यावेळी प्राचार्य आर आर भोई , गजानन शिदे , प्रा. गीतांजली पाटील ,रमेश कोरे , सुधाकर सावंत , भरत रसाळे प्रसाद पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
 प्राचार्य मंजुषा माळी यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सुरेखा कुंभार यांनी केले . राजेश वरक यांनी आभार मानले .