+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Sep 22 person by visibility 555 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते डॉ.अमरेश मेहता यांचा श्री भक्तामर स्तोत्र महिमा, नमोकार मंत्र, महात्म यासंबंधीचा मार्गदर्शनात्मक कार्यक्रम शनिवारी एक ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात होणार आहे. कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मेहता यांनी आतापर्यंत 51 देशांमध्ये व्याख्यान दिलेले आहेत.
 नाशिक येथील उद्योगपती राजू पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात हा  कार्यक्रम होत आहे. पाटील हे मूळचे ज्ञमाणगाव येथील आहेत. पाटील यांच्या पॅटको व जीतो संघटना कोल्हापूर  हे या कार्यक्रमाचे आयोजक व सहआयोजक आहेत.
 या तीन तासाच्या कार्यक्रमात डॉ.मेहता हे नमोकार मंत्र उपसर्ग निवारण स्त्रोत्र भक्तामर स्तोत्राचे प्रभावना चक्र अशा मंडळ प्रभावित करून प्रगती त्याद्वारे अध्यात्मिक प्रगती कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मांडणीला वैज्ञानिक सिद्धांताचा आधार असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक राजू पाटील, प्रा.डी.ए.पाटील, विक्रांत नाईक, सुरेश रोटे, सुकुमार पाटील, सुकुमार बेळंके, संजय शेटे, जयेश ओसवाल, डॉ. शीतल पाटील, सुरेश मगदूम आदींनी केले आहे.