+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule06 May 24 person by visibility 148 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यंदा मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.   वेगवेगळया संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने  जिल्ह्याच्या वैशिष्ट्यावर आधारित ७३ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा समावेश आहे. 
  जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्राची स्थापना झाली आहे  यांपैकी कोल्हापूर शहरात बारा व इचलकरंजी शहरात सहाअशी शहरी भागात १८ तर जिल्ह्यात ५५ अशी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय गुलाबी (पिंक), युवा व दिव्यांग मतदान केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील थिमॅटीक मतदान केंद्रांची माहिती पुढील प्रमाणे - पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कोडोली- लोकशाहीचा उत्सव, ग्रामपंचायत वाघुर्डे - बाल स्नेही गाव, ग्रामपंचायत दिगवडे- पर्यावरण पूरक गाव. तर  शाहुवाडी तालुक्यातील आंबा ग्रामपंचायत -वन उत्पादने/ग्रीन हाऊस, ग्रामपंचायत बांबवडे- बांबू हाऊस, ग्रामपंचायत सरुड- क्लीन अँड ग्रीन व्हिलेज, ग्रामपंचायत भेडसगाव -जैव विविधता. गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायत गगनबावडा- स्थानिक उत्पादन- करवंदे, फणस, जांभूळ, अळू प्रॉडक्ट्स इत्यादी, ग्रामपंचायत असळज- ग्रामीण पर्यटन, अणदुर ग्रामपंचायत- जलसंवर्धन/ सेव्ह वॉटर असणार आहे. 
 शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत नांदणी- भाजीपाला उत्पादक गाव, अब्दुललाट - खिद्रापूर मंदिर वास्तूकला, ग्रामपंचायत आगर- इंडस्ट्रियल हब, ग्रामपंचायत धरणगुत्ती -ग्रीन हाऊस, ग्रामपंचायत औरवाड- नद्यांचा संगम आणि घाटाचे दृश्य, ग्रामपंचायत टाकळी - सैनिकांचे गाव, करवीर तालुक्यातील- ग्रामपंचायत उजळाईवाडी - विमानतळ, ग्रामपंचायत कळंबा- गुऱ्हाळ घर, ग्रामपंचायत महे- सेंद्रिय शेती, ग्रामपंचायत खेबवडे -सैनिक गाव तर हातकणंगले तालुक्यातील- माणगाव ग्रामपंचायत- मूलभूत हक्क आणि कर्तव्य, शिरोली पुलाची ग्रामपंचायत- उद्योग:आर्थिक विकासाचा पाया, ग्रामपंचायत आळते- शांततापूर्ण जीवनाचे महत्त्व, ग्रामपंचायत पट्टणकोडोली - लघुउद्योगाचे महत्व, ग्रामपंचायत हुपरी- सिल्व्हर सिटी (चांदी व्यवसाय), ग्रामपंचायत कुंभोज- आधुनिक शिक्षण पद्धती, ग्रामपंचायत संभापूर- माझा गाव सुंदर गाव, ग्रामपंचायत अंबप- हरित गाव संकल्पना आहे. 
 चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत जांबरे- हरित व स्वच्छता ग्राम (जलसमृद्ध), ग्रामपंचायत बसर्गे- आत्मनिर्भर ग्राम (रेशीम उद्योग), ग्रामपंचायत कोदाळी- तिलारी नगर हरित व स्वच्छ ग्राम (जैव विविधता), ग्रामपंचायत हाजगोळी - बालस्नेही गाव, ग्रामपंचायत गुडवळे खा.- हरित व स्वच्छ ग्राम (बांबू लागवड), ग्रामपंचायत करेकुंडी -हरित व स्वच्छ ग्राम (जलसमृद्ध), आजरा तालुक्यातील- ग्रामपंचायत कोरिवडे- आजरा तालुक्याची विविधता, ग्रामपंचायत वाटंगी- पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, ग्रामपंचायत उत्तुर - धार्मिक व सांस्कृतिक, ग्रामपंचायत मुमेवाडी- उत्सव लोकशाहीचा देखावा
*गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत नेसरी- टीव्ही, मोबाईल, संगणक अतिवापराचे दुष्परिणाम, ग्रामपंचायत दुंडगे- पृथ्वी वाचवा, ग्रामपंचायत हेव्वाळ जलद्याळ- जलसंवर्धन, ग्रामपंचायत ऐनापुर - बालस्नेही गाव संकल्पना आहे.
 भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत पाटगाव - मधाचे गाव पाटगाव, ग्रामीण पर्यटन, ग्रामपंचायत पेठ शिवापूर- ग्रामीण पर्यटन व ऐतिहासिक स्थळे, ग्रामपंचायत मठगाव बश्याचा मोळा -ग्रामीण पर्यटन व जैव विविधता, ग्रामपंचायत अनफ खुर्द- अल्पसंख्यांकांसाठीच्या योजनांवर मतदान केंद्र.तर  कागल तालुक्यातील- लिंगनूर कापशी - कोल्हापूरी कापशी चप्पल, ग्रामपंचायत आलाबाद- महिला स्नेही ग्रामपंचायत, ग्रामपंचायत व्हन्नुर- बालस्नेही ग्रामपंचायत, ग्रामपंचायत कौलगे- सैनिकांचे गाव, ग्रामपंचायत बानगे- कुस्तीचे गाव, ग्रामपंचायत सुळकूड- भात लागवडीसाठी प्रसिद्ध गाव, ग्रामपंचायत कापशी- सरसेनापती घोरपडे यांचे जन्मगाव व राधानगरी तालुक्यातील- ग्रामपंचायत फेजीवडे- दाजीपूर अभयारण्य, ग्रामपंचायत सरवडे- राधानगरीचा शिष्यवृत्ती पॅटर्न ही संकल्पना आहे.