+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएस थ्री सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग adjust टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अरिंजय पाटील, वरद उंद्रे, सय्यम पाटील, नीरज जोर्वेकरची विजयी सलामी adjustकोल्हापुरात पाच दिवसीय आंबा महोत्सव adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule06 May 24 person by visibility 288 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी (सहा मे) टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृतीस्थळ येथे करवीरच्या जनतेसह शाहूप्रेमींनी अभिवादन केले.  शाहू सलोखा मंचाच्यावतीने १०२ सेकंद शांतता पाळून महाराजांना आदराजंली वाहिली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनेकांनी दर्शन घेतले.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू स्मतीस्थळांवर श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर, युवराज मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्विनीराजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मान्यवरांसह उपस्थित शाहूप्रेमींनी राजर्षी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून १०२ सेकंद शांतता पाळून आदराजंली वाहिली. यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना सह संपर्क नेते विजय देवणे, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर, कॉ. अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, पी.एल. बरगे, मेघा पानसरे, रघू कांबळे, दगडू भास्कर, सदानंद डिगे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अजय दळवी, उद्योजक तेज घाटगे, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, प्रमोद पाटील, वसीम सरकवास, माजी नगरसेवक तौफीक मुल्लानी, माजी नगरसेविका लिला धुमा, चंदा बेलेकर, राजेंद्र दळवी, नितिन जाधव, शफी मणेर, सुनील देसाई यांच्याह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............….
१०२ किलो तांदळातून रांगोळी
समाधीस्थळ परिसरात १०२ किलो तांदळातून राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा असलेली भव्य रांगोळी बीडचा कलाकार उद्देश गोवर्धन पघळ यांनी काढली. त्यांच्या रांगोळी शाहू छत्रपतीसह मान्यवरांनी अभिनंदन केले. रांगोळी सकारण्यासाठी उद्देश पघळला १२ तास लागले. शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा प्रसार केला. तसेच शेती आणि शेतकऱ्याला महत्व दिले होते. म्हणून १०२ किलोची तांदळाची रांगोळी काढल्याचे त्याने सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे यांनी रांगोळीसाठी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी उद्देशला विजय सगर, विश्वविजय कांबळे, रोहित कांबळे, अजिंक्य घाडगे, रतन सूर्यवंशी यांची मदत झाली.
…………
राहुल रेखावर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वाहिली आदराजंली
राजर्षी शाहू महाराज स्मृती शतक महोत्सवी वर्षाचे आयोजन दोन वर्षापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. त्यांची कोल्हापूरातून बदली झाली असली तरी आज सोमवारी सकाळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शाहूंना आदराजंली वाहिली. अदित्य बेडेकर यांच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला होता.