+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule04 May 24 person by visibility 82 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. हा ६३ वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठ, शुक्रवार पेठ येथे होणार आहे, अशी माहिती मठातील प्रतिनिधी सुरेश मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधील प्रत्येक मंदिराकडे पूजेचे नियोजन देण्यात येणार आहे. ह्यावर्षी केसापुर जैन मंदिरकडे पूजेचे नियोजन देण्यात आले आहे.
१० मे रोजी मांगलिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यामध्ये सकाळी ६.०० वाजता मंगल वाद्य घोष, ध्वजारोहण,८.३० वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर अभिषेक,श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक व षोडशोपचार पुजा आणि दुपारी २.०० वाजता आचार्यश्रींचे प्रवचन, ४.०० वाजता भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेकास सुरुवात होणार आहे. यामध्ये पंचामृत, प्रथम कलश, नारळपाणी, इक्षुरस, आमरस, दुग्धाभिषेक, सर्वोषधि, कल्कचूर्ण, कषायचूर्ण, श्वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, पूर्ण सुगंधित कलाभिषेक असे परंपरेनुसार अभिषेक करण्यात येणार आहेत. तसेच शांतीधारा, ईशान्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य असे चतुषकोन कलशाने अभिषेक होतील. त्यानंतर मंगल आरती, पुष्पवृष्टी आणि रत्नवृष्टीने या मंगलमय आणि धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल. 
या मस्तकाभिषेक सोहळ्यासाठी चर्याशिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज ससंघ(२९ पिंचि)यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. तसेच ज्योतिषाचार्य परमपूज्य प्रणामसागरजी महाराज ससंघ हे सुद्धा या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत.
 महाराष्ट्र दिल्ली आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू येथील कोल्हापूर सांगली सातारा रायबाग, बेळगाव, जिनकंची या मठातून लोक हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस भरतेश सांगरुळकर, कारभारी धनंजय मगदूम, नेमिनाथ कापसे, संजय आडके, संजय कापसे, संजय कोठावळे, अशोक रोटे, अनघा सांगरुळकर, ज्योती शेट्टी, पद्मा घोडके, रूपाली पत्रावळे, संमती हंजे उपस्थित होते.