+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Jan 23 person by visibility 265 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "मी राज्यातच ठीक आहे, दिल्लीला जाणार नाही."अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांनी मांडली.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले, "आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व केले. आमदारकीच्या माध्यमातून मुंबईपर्यंत प्रतिनिधी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भोगावती कारखाना परिसराचा विकास झाला. आता त्यांना खासदार करून दिलेला पाठवू." यानंतर बोलताना आमदार पी.एन. पाटील म्हणाले,"माझ्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी शेतकऱ्यांचा सत्कार गुन्हे विद्यार्थ्यांचा गौरव सरपंच आणि सदस्यांचा कौतुक सोहळा विविध उपक्रम राबविले या साऱ्या उपक्रमातून नवी प्रेरणा मिळणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण मी दिल्लीला जाणार नाही, येथेच ठीक आहे. "असे स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार पाटील यांच्या जीवनावर डॉक्टर दिनकर पाटील व डॉक्टर सुनील खराडे यांनी लिहिलेल्या सार्थी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी कृष्णाराव किरुळकर, कार्यकारी संचालक संजय पाटील, सुशील पाटील आदी उपस्थित होते. शिवाजीराव कारंडे यांनी आभार मानले.