शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठक
schedule11 Mar 25 person by visibility 87 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकां पाटील यांच्यासोबत विविध प्रलंबित प्रश्नासंबंधी भेट घेतली. या बैठकीत,सातव्या वेतन आयोगातील सुधारित आश्वासित प्रगती योजना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदांची तत्काळ भरती, अर्जित रजेचे रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे करणे, ग्रंथालय सहायक पदाची वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, प्रयोगशाळा परिचर व ग्रंथालय परिचर यांना २४०० आणि २८०० वेतन श्रेणीचा लाभ मंजूर करणे अशा प्रमुख मागण्यासंबंधी चर्चा केली. याप्रसंगी मंत्री पाटील यांनी, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेत महिन्याच्या अखेरीस पर्यंत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासित केले.
आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश राठोड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभाग संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, उपसचिव प्रताप लुबाळ, अवर सचिव संदेश उतेकर, महासंघाचे पदाधिकारी अध्यक्ष राजाभाऊ बढे, सरचिटणीस डॉ. सुजीत आर. बी सिंह, कार्याध्यक्ष शशिकांत कामटे, गोविंद जोशी, उपाध्यक्ष अनिल घाडगे, दिलीप गुरव, अशोक जाधव, उमेश देशमुख, चिटणीस दिलीप मोरे, दिलीप पवार, खजिनदार सदानंद लांडगे, कार्यकारीणी सदस्य विनोद तोडणकर, राजू औनर, सुहास भगत, चंदर पांडेजी उपस्थित होते