विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंग
schedule11 Mar 25 person by visibility 39 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रांतीसिंह नाना पाटीलनगर रिंगरोडवरील गंधर्वनगरीतील कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये मंगळवारी `वनस्पतीजन्य रंग निर्मिती कार्यशाळा ` झाली. एकूण ४१ प्रकारच्या वनस्पतीपासून इको फ्रेंडली रंग तयार केले. शिलेदार हायकर्स फाउंडेशन, निसर्गमित्र आणि कर्मवीर स्कूलतर्फे कार्यशाळा झाली.
निसर्ग मित्रचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी रासायनिक रंगाचे शरीरावर होणार्या दुष्परिणामाची माहिती सांगितली. बाजारात मिळणारे रंग अतिशय घातक असतात. त्याचा घातक परिणाम शरीरावर होतो. त्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते. हे सर्व नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यानी घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार केले पाहिजेत असे ते म्हणाले. या वेळी विद्यार्थ्यांनी घरातून आणलेल्या विविध फुला, पानांपासून नैसर्गिक रंग तयार केले. तसेच गुढीपाडव्याची साखरमाळ घरीच तयार करण्याचे प्रात्याक्षिकही यावेळी चौगुले यांनी दाखविले.
मॉडर्न शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश कचरे, सचिव डॉ. सायली कचरे यांच्या हस्ते शिलेदार हायकर्स फाउंडेशनचे संचालक नितीन पाटील, सचिन यादव यांचा सत्कार झाला. शिलेदार हायकर्सचे ओंकार पावले, प्रथमेश पोवार, मुकुल कांबळे, मयूर कांबळे, ओमकार साळोखे, अक्षय शिंदे उपस्थित होते. स्कूलच्या व्यवस्थापक ज्योती लगारे, मुख्याध्यापिका प्रियांका धनवडे, पर्यवेक्षक विशाल भोरे, मीरा चौगले, रुपाली निकाडे, सुरेखा काशीद, रसिका पोतदार, अमृता ताटे, अश्विनी पाटील, दीपाली चव्हाण, सेजल तराळ, सुरेखा कुलदीप, तेजस्विनी भोसले, कविता देसाई, दिपाली लव्हटे, आरती जाधव, सुप्रिया पाटील, लक्ष्मी कांबळे, अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.