पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडे
schedule12 Mar 25 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : पीएम विद्यालक्ष्मी योजनेतून विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपले अपार आयडी काढून घ्यावेत, त्यांना जगभर उच्च शिक्षणाच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, यासाठी अपार आयडी गरजेचा आहे असे प्रतिपादन कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ.धनराज नाकाडे यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शहाजी ऊर्जा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी कॉलेजमधील ७२ गुणवंत विद्यार्थ्यांना १०७ ऊर्जा पारितोषकाचे वितरण करण्यात आले.
महाविद्यालयातील विविध उपक्रमांच्या फोटोंचे प्रदर्शन व यशवंतराव चव्हाण यांच्या ग्रंथांचे प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभी करण्यात आले. प्राचार्य शानेदिवाण म्हणाले, महात्मा फुले, छत्रपती शाहूजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन हे महाविद्यालय पुढे जात आहे. विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त करावे मात्र शिक्षणासाठी ज्यांची मदत झाली आहे त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता बाळगावी .यशवंतराव चव्हाण तसेच श्रीपतराव बोंद्रे यांच्या विचारांचा वसा, वारसा या संस्थेच्या माध्यमातून जपला जात आहे. त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत.
समारंभात स्टुडन्ट ऑफ द इयर चा सन्मान वरिष्ठ विभागातील ऋतुजा कुंभार व मोनिका हुंबे यांना विभागून देण्यात आला.तसेच कनिष्ठ विभागातील समीक्षा शरद माने यांना देण्यात आला. उपक्रमशील प्राध्यापक सन्मान डॉ.ए बी बलुगडे यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट विभाग म्हणून राज्यशास्त्र विभागाची निवड करण्यात आली. विभाग प्रमुख डॉ. आर. डी. मांडणीकर व डॉ. विजय देठे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयाचे अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. डॉ. सुरेश शिखरे यांनी स्वागत केले. डॉ. सरोज पाटील व प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.डी.के.वळवी यांनी आभार मानले.