सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मान
schedule12 Mar 25 person by visibility 169 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सारस्वत विकास मंडळातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आयुर्वेदाचार्य डॉ. विवेक हळदवणेकर व प्रचिती हळदवणेकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान झाला. विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर, सारस्वत बोर्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी स्वर्गीय अनुराधा तेंडुलकर यांच्या नावांनी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौम्या तिरोडकर यांना गौरविले. डॉ. वंदना पुसाळकर यांना आर्किटेक्चरमधील डॉक्टरेट मिळाल्याबद्दल तर एसटीमध्ये महिला हेड मेकॅनिक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रुपाली भोपळे-पाटील यांचा सत्कार झाला.राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल कोच परीक्षा पास झाल्याबद्दल सिद्धी शेळकेचा सत्कार झाला. यावेळी सारस्वत विकास मंडळाचे गौरी घोलकर, मिलन होळणकर, खजानीस गुरुनाथ देशपांडे, विश्वस्त गिरीश घोलकर, सुनील होळणकर, माधवी देशपांडे आदी उपस्थित होते.