आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' स्पर्धेला सुरुवात, बुधवारी बक्षीस समारंभ
schedule11 Mar 25 person by visibility 52 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रणित 'आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' चा उद्घाटन सोहळा कळंबा येथील स्पोर्ट्स कॅसल टर्फ येथे मोठ्या उत्साहात आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि कारागीर यांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश चावरे, पद्मप्रभू रणदिवे आणि पंकज तलरेजा यांनी उपस्थित होते. तसेच अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर, संचालक मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रिकेट लीगचे आयोजन अमर मोरे, रणजीत जाधव, सुनील मुसळे, अजय खाडे आणि दीपक महामुनी यांनी केले आहे. या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष संघांसोबतच महिला संघदेखील बरोबरीने खेळत आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ बुधवारी (१२ मार्च ) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. चित्रपट क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आणि रसिकांनी या समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजनकांनी केले आहे.