शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठक
schedule12 Mar 25 person by visibility 81 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’असेच कायम राहावे यासाठी शिवप्रेमींची बैठक शुक्रवारी (१४ मार्च २०२५) होत आहे. विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विषय सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शुक्रवारी शिवप्रेमींची बैठक होत असल्याचे म्हटले आहे. मुळीक यांनी म्हटले आहे, ‘शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेला ६३ वर्षे झाली आहेत. शिवाजी विद्यापीठ हे नाव कोल्हापूरकरांच्या मनात रुजले आहे. मात्र सध्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार मागणी पुढे आली आहे. विद्यापीठाच्या नावात बदल नको यासाठी सर्वंकष विचार विनियम करण्यासाठी बैठक बोलावले आहे. दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस इतिहासकार, राजकीय व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, आजी-माजी विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठ या नावात कोणताही बदल होऊ नये यासाठी शिवप्रेमींनी मोठया संख्येने यामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.