Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठकपीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडेशेतकऱ्यांची मुंबईत धडक !  आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!! सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मानशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठककेआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानविद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंगआम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' स्पर्धेला सुरुवात, बुधवारी बक्षीस समारंभ आरडी सिनेमातून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम

जाहिरात

 

आरडी सिनेमातून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम

schedule11 Mar 25 person by visibility 99 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  आयुष्यात एखादी चूक घडते. पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी "आरडी" या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. २१ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा रंजक टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 

सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकारांची टीम कोल्हापुरात आली होती. साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख  हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. पण त्या चुका लक्षात घेऊन, माफी मागून वागणुकीत बदल करायचा असतो. चुकीबद्दल माफी न मागितल्यास भविष्यात त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच परिणामांची थरारक गोष्ट आरडी या चित्रपटातून उलगडल्याचं टीजरमधून दिसतं आहे. नव्या दमाच्या टीमचा आश्वासक प्रयोग टीजरमधून स्पष्ट होत आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील "वढ पाचची..."  हे धमाल पार्टी   गीतही साध्य सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले आहे. सिनेमात एकूण चार गाणी आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes