महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : टिंबर मार्केट शहाजी कॉलनी येथील सुनील उर्फ सोन्या विजय काळे (वय ३७) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुनील याचे जुना वाशी नाका जवळ मटन आणि चिकन विक्रीचे दुकान आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता सुनिलने राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून केल्याचे घरच्यांना दिसून आले. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल केले पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुनील काळे हा मुळचा शुक्रवार पेठ पिवळा वाडा येथील रहिवासी होता. स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी तो टिंबर मार्केट परिसरामध्ये एक वर्षापूर्वी राहायला गेला होता. त्याच्या पश्चात वडील, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.