+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule10 Mar 24 person by visibility 6518 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘थेट पाइपलाइन योजना कार्यान्वित होऊन सहा महिन्याचा कालावधी होत आला. या योजनेतील त्रुटी समोर येत आहेत. अजूनही शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. रोज कोणत्या ना कोणत्या भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. शहरवासियांना मुबलक स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा यासाठी थेट पाइपलाइन योजनेच्या कामातही लक्ष घालणार आहे. थेट पाइपलाइनच्या कामाची पाहणी करणार आहे’असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. थेट पाइपलाइन योजनाही सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो. पाइपलाइन योजनेच्या मंजुरीवरुन आमदार पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही अशी एकवेळ घोषणा केली होती.
 ‘एकांनी पाण्याने आंघोळ केली, श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पण या कालावधीत शहरात कुठे ना कुठे पाणी समस्या आहे. रोज महिला, नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे श्रेयवादासाठी नव्हे तर, थेट पाइपलाइन योजनेतील त्रुटी दूरू करुन शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी याकामात लक्ष घालणार आहे.’असा टोला महाडिक यांनी लगाविला.
‘कोल्हापूर विमानतळाच्या विकासकामांवरुनही श्रेयवाद सुरू आहे याकडे लक्ष वेधले असता महाडिक म्हणाले, ‘श्रेयवाद घेणारे घेऊ देत, पण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे की विमानतळ विकासासाठी कोणी प्रयत्न केले. मी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला. अधिकारी, मंत्र्यांची भेट घेतली.उद्योजकांशी संवाद साधला. काही जण अनेक वर्षे मंत्री होते. रोज उठून विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करायचे. त्यांच्या कालावधीत अनेक वर्षे विमानसेवा बंद होती. मी लोकसभेत खासदार असताना व आता राज्यसभेत खासदार म्हणून काम करताना विमानतळ विस्तारीकरण व अन्य कामासाठी अथक प्रयत्न केले. आता कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, नूतन टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण झाले याचे मनस्वी समाधान आहे.’असेही महाडिक म्हणाले. आता थेट पाइपलाइन योजनेच्या कामाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण रोज तक्रारी येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीतून पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी दूर करू. ’