+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Nov 22 person by visibility 575 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरातील रस्ते दुरुस्ती आणि दर्जा यासंबंधी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या आंदोलनातंर्गत चौथ्या दिवशी अर्थात शुक्रवारी महापालिकेसमोर घुगुळ नाचवून जागर करण्यात आला.
 शहरात होणारे रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी महापालिकेने क्वालिटी कंट्रोल प्लॅन जाहीर करावा, वॉर्ड निहाय नागरिकांची रस्ते दक्षता समिती करावी, शंभर कोटींच्या रस्ते विकास निधीसाठी पाठपुरावा करावा यासाठी आपतर्फे जागर आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी हलगीच्या ठेक्यावर घुगुळ नाचवत दर्जेदार रस्त्यांसाठी जागर करण्यात आला. याचे नियोजन सूरज सुर्वे आणि सचिन वणिरे यांनी केले. आणि शाहीर मिलिंद सावंत यांनी जागर करीत रस्त्यांची दुर्दशा मांडली
रस्त्यांचा क्वालिटी कंट्रोल प्लॅन, स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, रस्ते दक्षता समिती व शंभर कोटींच्या रस्ते निधीबाबत ठोस कार्यवाही मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, अभिजीत कांबळे, अमरजा पाटील, डॉ. उषा पाटील, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, ऍड.चंद्रकांत पाटील, प्रकाश सुतार, अभिषेक पाटील, डॉ. कुमाजी पाटील, विजय हेगडे भाग्यवंत डाफळे, शशांक लोखंडे, रविन्द्र राऊत, मयूर भोसले, रवींद्र ससे, आनंदराव चौगुले, सचिन वणीरे, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.