+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Mar 24 person by visibility 126 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती ताराराणी चौकातील विश्रामगृहाचे जतन-संवर्धन करून, पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. 
 ताराराणी चौकातील विश्रामगृहाची उभारणी छत्रपती राजाराम महाराजांनी १९३९ मध्ये केली आहे. संस्थान काळात या विश्रामगृहाला ट्रॅव्हलर्स बंगला म्हणून ओळखले जात होते. सुमारे एक एकर भूखंडावर असलेल्या या ऐतिहासिक विश्रामगृहाचा ऐतिहासिक वारसा स्थळाच्या क्रमांक दोनच्या यादीमध्ये समावेश असून, हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. संस्थान काळापासून कोल्हापूरच्या विकासाचे साक्षीदार असणारे या विश्रामगृहाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. यामुळे विनावापर पडून आहेत. 
अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यासह अनेक विद्वानांची निवासाची व्यवस्था या ऐतिहासिक विश्रामगृहात केली होती. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. परंतु या ऐतिहासिक वास्तूची मोक्याची जागा हडप करण्यासाठी काहीजण सक्रिय झाल्याचे समजते. 
त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धनसाठी सरकारने पुढाकार घेऊन निधीची तरतूद करावी.