महाराष्ट्र न्यूज वनचे पाचव्या वर्षात पदार्पण ! व्हिजीटर्सचा टप्पा ५८ लाखांवर !!
schedule04 Jul 24 person by visibility 565 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन : वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी, दर्जेदार लिखाण आणि विश्वसनीय बातम्या यामुळे वाचकांची मने जिंकलेल्या महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज पोर्टलने यशस्वपीणे पाचव्या वर्षात पदार्पण केले. पाच जुलै रोजी या न्यूज पोर्टलचा चौथा वर्धापनदिन आहे. या चार वर्षाच्या कालावधीत वाचक, हितचिंतक व जाहिरातदार यांनी जो विश्वास दाखविला, त्या बळावरच महाराष्ट्र न्यूज वनची घोडदौड सुरू आहे. व्हिजीटर्सची संख्या तब्बल ५८ लाखांहून अधिक आहे.
कोल्हापुरातील एक आघाडीचे न्यूज पोर्टल म्हणून महाराष्ट्र न्यूज वनची ओळख बनली आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या घटनांची नोंद ठळकपणे वाचकापर्यंत ते पोहविण्याची खासियत निर्माण केली आहे. मोठया घटना असोत की महत्वाच्या बातम्या त्या सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज वनने ठळकपणे वाचकांपर्यंत पोहोचविल्या. महापालिकेतील घडामोडी, जिल्हा परिषदेच्या लोकाभिमुख योजना, राजकारणातील हालचाली, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, सांस्कृतिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, शैक्षणिक जगतातील माहिती, उद्योगविश्चातील बदलते तंत्र हे सारं वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध केले आहे.
पाच जुलै २०२० मध्ये महाराष्ट्र न्यूज वनची सुरुवात झाली. २०२० चे वर्ष म्हणजे कोरोनाचा काळ. या कठीण काळातही महाराष्ट्र न्यूज वनची कामगिरी धडाडीची ठरली. समाजाशी निगडीत प्रत्येक घटना वस्तुनिष्ठपणे नागरिकांपर्यंत पोहोचविली. शैलीदार लिखाण, दर्जेदारपणा आणि विश्वासार्हता ही त्रिसूत्री महाराष्ट्र न्यूज वनने जपली आहे. जे समाज हिताचं आहे त्यांना बळ दिले आहे. आणि जे समाजहिताच्या विरोधी आहे त्याचा निर्भीडपणे समाचार घेतला आहे. निपक्ष:पातीपणे लिखाण करत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
समाजकारण, राजकारण, सहकार, क्रीडा, सिनेसृष्टीतील घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाज यावर सातत्याने लिखाण करत समाजमनाशी घट्ट नाळ जुळविली आहे. या वाटचालीत जाहिरातदार, वाचक, हितचिंतक अशा विविध घटकांनी नेहमीच सहकार्य केले. महाराष्ट्र न्यूज वनसोबत स्नेहबंध निर्माण केला. या संचितावरच महाराष्ट्र न्यूज वन पाचव्या वर्षात यशस्वीपणे पाऊल टाकत आहे. ‘महाराष्ट्र न्यूज वन’चा चौथा वर्धापनदिन साजरा करताना ‘लोक आमच्या सोबत आणि आम्ही सदैव नागरिकांसोबत’ हा विश्वास आणखी दृढ होत आहे. साऱ्यांच्या सदिच्छाच्या बळावर महाराष्ट्र न्यूज वनच्या यशाचा आलेख उंचावत आहे.