+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule13 Jul 24 person by visibility 149 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दत्ताजीराव कवाळे, उपाध्यक्षपदी अॅड. सागर रमेश शिंदे विजयी झाले. सिटी क्रिमिनल बार असोसिएशनच्या २०२४-२५ या वर्षासाठी शुक्रवारी (बारा जुलै २०२४) मतदान झाले. असोसिएशनच्या सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही प्रक्रिया पार पडली. यानंतर मतमोजणी झाली.
अध्यक्षपदासाठी अॅड. कवाळे व अॅड. सुनील धुमाळ यांच्यात लढत झाली. यामध्ये कवाळे यांना ९५ तर धुमाळ यांना ७० मते मिळाली. कवाळे पंधरा मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी सागर शिंदे आणि बालाजी दगडू राखुंडे यांच्यात लढत होती. यामध्ये शिंदे यांना ८० तर राखुंडे यांना ६९ मते मिळाली. सचिवपदासाठी अॅड. संदीप पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. एस. बी. मकानदार, अॅड. सोमनाथ नडमने, अॅड. अविनाश रायबागकर, अॅड. प्रकाश पाटील यांनी काम पाहिले.