+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule07 Sep 24 person by visibility 68 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वच निवडणुका ताकतीने लढविणार अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. सामान्य माणसाच्या आणि उपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख मोठ्या ताकदीने पुढे घेऊन जात आहेत, याचा निश्चित आनंद आहे असे गौरवोद्गगार पाटील यांनी काढले.
स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शिक्षण संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी देशमुख यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन झाले. सर्वच नेत्यांनी देशमुख यांच्याविषयी गौरवोद्गगार काढले. आपल्या राजकीय प्रवासात शारंगधर देशमुख यांची साथ महत्वपूर्ण ठरल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी मराठा महासंघाचे राष्टीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी महापौर निलोफर आजरकेर, माजी उपमहापौर विक्रम जरग, परिक्षीत पन्हाळकर, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राहुल माने, अभिजीत चव्हाण, सचिन पाटील, प्रवीण केसरकर, संदीप पाटील, सुयोग मगदूम, शिवानंद बनछोडे, सूरज देशमुख, प्रीती देशमुख, अर्जुन पाटील, किरण पाटील, गुरुप्रसाद जोशी आदी उपस्थित होते.