+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Jan 23 person by visibility 309 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
फार्मसी क्षेत्र हे प्रचंड वेगाने विस्तारणारे क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. जीवनाच्या अंतापर्यंत फार्मसी क्षेत्राची आवश्यकता भासते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.
  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी. फार्म, डी. फार्म शाखासाठी प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ गुरुवारी संपन्न झाला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
   प्रारंभी डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांचे स्वागत केले. कुलगुरू डॉ. मुदगल यानी अभिमत विद्यापीठ उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपकुलसचिव संजय जाधव, सुरेंद्र खोपडे, फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अभिनंदन पाटील, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 
दोन विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती.....
 डी. फार्मसाठी सर्वाधिक गुणांनी प्रवेश घेतलेल्या सानिका सज्जन पाटील व बी. फार्मसाठी सर्वोत्तम गुणांनी प्रवेश घेतलेल्या दिव्या नामदेव लाड या दोन्ही विद्यार्थीनीना कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशीप जाहीर केली. या दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते या दोघीना याबाबतचे पत्र देण्यात आले.