+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Apr 24 person by visibility 1648 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला आहे. मात्र महायुतीमध्ये अद्याप रुसवे फुगवे काही  संपायची चिन्हे नाहीत. आमदार प्रकाश आवाडे हे प्रचारात सक्रिय आहेत. मात्र त्यांचे समर्थक व माणगावचे सरपंच राजू मगदूम हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत.             जिल्हा परिषदेचे प्रभाग रचना, दलित वस्ती सुधार योजना यावरून मगदूम हे खासदार माने यांच्या कामावर नाराज आहेत. जिल्हा परिषद प्रभागाच्या रचनेवरून आवाडे व माने गटात वाद उफाळला होता. कायदेशीर लढाई झाली होती. प्रभाग रचनेचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. त्याशिवाय दलित वस्ती सुधार योजना निधी वाद ही उच्च न्यायालयात गेला व तिथे उच्च न्यायालयाने न्याय दिला अशा अनेक राजकीय गोष्टी मुळे नाराज असलेले आवाडे गटाचे ग्रामीण भागातील मुख्य शिलेदार माणगावचे सरपंच राजू मगदूम हे खासदार माने यांच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे दिसत आहेत. सरपंच  मगदूम यांनी  आदर्श सरपंच म्हणून  ओळख. आहे.  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन, आदिनाथ बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशा विविध पातळीवर काम करत आहेत.  जिल्हा परिषदेचे माध्यमातून त्यांनी रुकडी, अतिग्रे, माणगाववाडी,साजणी, तिळवणी,रुई, सहारानगर, पट्टनकडोली या आजूबाजूच्या गावात विकास निधी दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आमदार आवाडे हे महायुतीचे घटक आहेत. ते खासदार माने यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. दरम्यान राजू मगदूम व त्यांचा संपूर्ण मित्र परिवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे आमदार प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे,यांनी राजू मगदूम यांची समजूत काढण्याचा  प्रयत्न केला असल्याचे समजते पण अद्याप ही मगदूम हे प्रचारात सक्रिय नाहीत. त्याचा फायदा कोणाला व फटका कोणाला बसणार याविषयी चर्चा सुरू आहे.