पर्यटन -प्रवास सुविधा केंद्रातर्फे जागतिक पर्यटन दिन साजरा
schedule28 Sep 24 person by visibility 235 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
जागतिक पर्यटन दिनानिमित्त (२७ सप्टेंबर) शिवाजी विद्यापीठमधील पर्यटन व प्रवास सुविधा केंद्रातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना पर्यटनाची ओळख व्हावी, विद्यार्थी पर्यटनाकडे आणि पर्यटन क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणूण वळावेत यासाठी पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्तींचे अनुभव आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून या क्षेत्रात कार्यरत कृष्णराव माळी, अबोली सोनटक्के आणि संदीप शिंदे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
या मुलाखतीत अबोली सोनटक्के रावळ (वीणा वर्ल्ड कोल्हापूर), कृष्णराव माळी (ट्रॅव्हेला, कोल्हापूर) व संदीप शिंदे (राही टूर्स कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. ,
कृष्णराव माळी यांनी कोल्हापूर ग्रामीण पर्यटनाबद्दल सखोल माहिती दिली, ज्यात स्थानिक संसाधने, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा समावेश होता. अबोली सोनटक्के यांनी प्रवासातील नवीन तंत्रज्ञान, शाश्वत पर्यटनाची गरज, आणि प्रवाशांच्या बदलत्या आवडी यांवर चर्चा केली.
संदीप शिंदे यांनी शून्यातून व्यवसाय स्थापन करीत असताना काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली हे अनुभव सांगितले तसेच या व्यवसायात येताना विद्यार्थ्यांनी काय करावे हे हि मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पर्यटन व प्रवास सुविधा केंद्राच्या समन्वयक मीना पोतदार, तसेच भूगोल विभागातील प्राध्यापक विदयार्थी उपस्थित होते.