जिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !
schedule21 Nov 25 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजनेंतर्ग कोल्हापूर जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२५ अखेर पन्नास हजार घरकुले पूर्ण करण्यासाठी मोहिम आखली आहे. सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही कामे होत आहेत. केंद्र पुरस्कत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-दोन (ग्रामीण) २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये ५३८३६ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ३० ८८१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहेत व २२९५५ घरकुलाच्या कामाला सुरूवात झाली नाहीत. मंजूर झालेली घरकुल लाभार्थ्यांनी पावसाळा कारणामुळे व अन्य कारणामुळे घरकुल बांधकाम सुरू करणेत आलेली नव्हती. पावसाळा कालावधी आता संपल्यामुळे सर्व लाभार्थी यांनी घरकुले बांधकाम तात्काळ सुरु करून घेणेची आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी सुरू नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी घरकुल पायाभरण / शुभारंभ कार्यक्रम दहा नोव्हेंबर २०२५ रोजी पासून आयोजित केला होता. त्यानुसार १०,३३८ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केली आहेत. आजअखेर ३५३४ घरकुले अंतिमतःपूर्ण झालेली असून, या योजनेअतर्गत 50294 अद्यापही घरकुले अपूर्ण आहेत. तसेच राज्य आवास योजनेतील 4795 अद्यापही घरकुले अपूर्ण आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर लाभार्थीपैकी पहिला हप्ता 50287 लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. तसेच ज्या लाभार्थींनी घरकुले सुरु केली आहेत अशा ३११३० लाभार्थीना दुसरा हप्ता व १३४३६ लाभार्थीना तिसरा हप्ता जमा केला आहे.
मंजूर झालेल्या व सुरु नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल सुरु करून घरकुल बांधकामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी. तसेच घरकुल पूर्ण करणेसाठी आवास योजनेचा निधी बाबतची आता कोणतीही अडचण भासणार नाही, तसेच सर्व लाभार्थी यांना वेळेत बांधकाम पूर्ण करणेसाठी टप्पा निहाय निधी उपलब्ध होणार आहे. तरी सर्व लाभार्थी यानी घरकुले तातडीने सुरु करावे. तसेच घरकुल कामाचे अनुदान वितरण व इतर कोणत्याही कामासाठी कोणीही आर्थिक बाबत अडवणूक करत असलेस 0231-3580295 या क्रमाकावरती संपर्क करावा. तसेच पंचायत समितीकडील गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.