Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !ज्येष्ठांच्या हक्कासाठी मंगळवारी कोल्हापुरात सन्मानवारीकृतज्ञतेचा कृतीशील पाठ , शिक्षकांनी जमविला निधी! विद्यार्थ्यांची संकल्पना एक वही-एक पेनची ! !तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामउद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेशसौंदत्ती यात्रेसाठी एसटी भाडे- खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागरजिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस, तर सरपंचावरही कारवाई ! सीईओंनी काढला आदेशकागलात दोन उमेदवारांची माघार, मुश्रीफांच्या स्नुषा बिनविरोधशिरोली एमआयडीसीत युवा उद्योजकात मारहाण, मोटारीची तोडफोडसमरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, जनता निवडणुकीत धडा शिकवेल – व्ही. बी. पाटील

जाहिरात

 

कागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !

schedule20 Nov 25 person by visibility 75 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कागल नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रोज नव्या राजकीय खेळया आकाराला येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यातील दिलजमाईनंतर कागल नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी होणार अशी चिन्हे असताना शिवसेना शिंदे गटाने ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आता पालकमंत्र प्रकाश आबिटकर यांची ताकत उभी राहणार आहे. कोणत्याही उमेदवाराने माघार घेऊ नये तसेच दबावाच्या  राजकारणाला बळी पडू नये म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना कागलमधून अन्यत्र हलविले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार कागलमध्ये दाखल होतील. कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री आबिटकर यांच्यातील  शह काटशहाचे राजकारण पाहावयास मिळत आहे.

गटातटाच्या राजकारणात विखुरलेल्या कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीत नवी समीकरणे आकाराला येत आहेत. गेली दहा वर्षे एकमेकांविरोधात लढलेले मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात दिलजमाई झाली. कागलमधील हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता वाटत असताना माजी खासदार मंडलिक यांनी शड्डू ठोकला. शिवसेनेतर्फे नगरपालिकेच्या सर्व जागा लढविल्या जातील अशी घोषणा केली. मुश्रीफ व समरजितसिंह यांच्यातील युतीमुळे काही अंशी नाराज झालेल्या माजी आमदार संजय घाटगे यांची भेट घेतली. दरम्यान मंगळवारी प्रभाग क्रमांक नऊमधील  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवार नूरजहाँ निसार व अपक्ष उमेदवार मोहबतबी शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा मंडलिक गटाला धक्का होता.

शिवसेनेच्या अन्य कोणत्याही उमेदवाराने माघार घेऊ नये तसेच दबावाच्या राजकारणाला बळी पडू यासाठी पक्षाच्या सगळया उमेदवारांना अन्यत्र हलविले आहे. कागलच्या राजकारणात मंडलिक गट एकाकी लढाई करत असल्याचे समोर आल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांची ताकत आता या गटाच्या पाठीशी उभी केली आहे. मुश्रीफ व आबिटकर हे महायुतीत असले तरी दोघेही एकमेकांवर कुरघोडी व  शह-काटशहाची एकही संधी सोडत नाहीत. पहिल्यांदा पालकमंत्रीपदावरुन दोघांतील सुप्त संघर्ष जिल्हयाने पाहिला. तत्पूर्वी आबिटकर व मुश्रीफ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतही आमनेसामने होते. आता कागल नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा या दोन मंत्र्यांतील वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes