+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule22 Jul 24 person by visibility 625 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतमधील ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग (रा. कृष्णतारा अपार्टमेंट, मराठा कॉलनी कसबा बावडा ) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. नऊ हजार रुपयांची लाच स्विकारताना अदलिंगला रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषद मुख्यालयच्या इमारतीत सोमवारी, २२ जुलै रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. मुख्यालय इमारतीमध्येच लाचलुचपत प्रकरणी कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांमुळे खळबळ उडाली.
या प्रकरणातील तक्रारदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी कबनूर गावातील वॉर्ड नंबर दोनमधील वाढीव पाइप लाइन बसविण्याच्या कामाची निविदा भरली आहे.निविदेप्रमाणे कामाची  विचारणा करण्यासाठी तक्रारदार काँन्ट्रॅक्टरनी  आदलिंग यांची भेट घेतली. तेव्हा आदलिंग यांनी कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे नऊ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा लावला. तक्रारदारांकडून नऊ हजाराची लाच घेताना आदलिंग यांना रंगेहाथ पकडले. 
शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक बापू साळुंखे , पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीत ही कारवाई केली. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली. जिल्हा परिषदेत ग्रामसेवकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. या पदोन्नती प्रक्रियेसाठी ग्रामसेवक मोठया संख्येने जिल्हा परिषदेत दाखल होते. या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५७ वर्षीय गणपत आदलिंगवर लाच प्रकरणी कारवाई केली. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.