+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 69 categoryउद्योग
व्हाइस चेअरमनपदी रमनलाल संघवी, राजीव परीख, जितो यूथ विंगच्या अध्यक्षपदी प्रतीक ओसवाल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
जैन इंटरनॅशलन ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो), कोल्हापूर चॅप्टरचा पदग्रहण समारंभ दिमाखात पार पडला. याप्रसंगी २०२४- २६ या दोन वर्षासाठी जितो, कोल्हापूर चॅप्टरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जितो, कोल्हापूर चॅप्टरच्या चेअरमनपदी बांधकाम व्यावसायिक रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे यांची निवड झाली.
जितोचे अध्यक्ष विजय भंडारी, रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे (रोम) चेअरमन राजेंद्र जैन, रोमचे व्हाइस चेअरमन नेमचंद संघवी, जितोचे विश्वस्त उद्योगपती संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. हॉटेल सयाजी येथे मंगळवारी हा समारंभ झाला. जितो कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन कार्यकारिणीत व्हाइस चेअरमनपदी रमनलाल संघवी, राजीव परीख यांची निवड झाली. सचिवपदी जयकुमार पारीख, सहसचिवपदी हर्षद दलाल, सहखजानिसपदी शीतल भंडारी, आयपीसीपदी गिरीष शहा, संचालकपपदी जितेंद्र राठोड, जितेंद्र गांधी, चंद्रकांत ओसवाल, दिलीप ओसवाल यांच्या निवडी झाली. जितो यूथ विंगच्या अध्यक्षपदी प्रतीक ओसवाल यांची निवड झाली.
जितोचे अध्यक्ष विजय भंडारी म्हणाले, ‘समाजासाठी काम करणारी जितो संघटना आहे. सेवा, समृद्धी आणि आर्थिक सधनता या तत्वानुसार जितो संघटनेचे काम चालते. ही संघटना मोठया लोकांची नव्हे तर लोकांना मोठं करणरी संस्था आहे. विविध संकल्पना घेऊन संघटना काम करत असते. संकल्पना या जीवनात बदल घडवू शकतात. जितोमार्फत भविष्यात समाजासाठी आवास योजना, शैक्षणिक अर्थसहाय, आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन यावर फोकस राहील.”
  कोल्हापूर जितोचे नूतन अध्यक्ष रवी संघवी यांनी जितोचे सभासद वाढविणे, संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याला प्राधान्य राहील असे सांगितले. या कार्यक्रमाला उद्योजक सुरेंद्र जैन, युवराज ओसवाल, राजीव व्ही. परीख यांच्यासह जितोचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
………………………………………………………
जितोशी जोडा जीवन बदलेल- संजय घोडावत
जितोचे विश्वस्त संजय घोडावत म्हणाले, ‘जितोचे कार्य विविध देशात सुरू आहे. सगळयांना एकत्र आणून काम करणारी ही संघटना आहे. जितोशी जोडा, जीवन बदलेल.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक व्यवहार, सकारात्मक विचार, आनंदमय जीवन आणि दुसऱ्यांना मदत करण्याची भूमिका अंगिकारली पाहिजे. वेळ निघून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सध्य स्थितीत आय एम विथ यू म्हणा.’