+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 85 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध विक्रीचा बुधवारी उच्चांक केला. एका दिवसात 18 लाख 65 हजार लिटर दुधाची विक्री झाली. गोकुळच्या इतिहासातील एका दिवसातील ही सर्वाधिक दूध विक्री आहे. दूध विक्रीच्या उच्चांकाबद्ल  गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.                                          यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे तसेच दिवाळी सणामध्ये तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारखे उपपदार्थ हि मोठ्या प्रमाणावर विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट असून ते दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.बुधवारी 16 ऑक्टोबर 2024 दिनी  कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी गोकुळने दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित करताना १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे. गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्‍या दिवशी १७ लाख ८० हजार ९८५ लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केलेली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ ८३ हजार ७७४ लिटर्स ने वाढ झालेली आहे. दूध विक्रीमध्ये नवनवीन मानदंड प्रस्थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी, वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे योगदान असल्याचे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले
 याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, वरिष्ठ अधिकारी डॉ.एम.पी.पाटील, बाजीराव मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम  उपस्थित होते.