Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपच्या ११०० शाळा बंद, प्राथमिकचे जवळपास सात हजार शिक्षक आंदोलनातशिक्षकांच्या मोर्चाला प्रचाराचं वारं ! पदवीधर –शिक्षकमधील इच्छुकांनी साधली संपर्काची संधी !!कोल्हापुरात आठ - नऊ डिसेंबरला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ! स्पर्धेचे नोडल सेंटर म्हणून केआयटीला चौथ्यांदा मान !!पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफार्मरची चोरी, पोलिसांकडून तपासात दुर्लक्ष !  इरिगेशन फेडरेशनचे सोमवारी आंदोलन !!कोल्हापुरात होणार सुषिर महोत्सव, नामवंत कलाकारांचा सहभागमार्केट सेसच्या विरोधात व्यापाऱ्यांचा बंद ! कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने !!एकच मिशन -सक्तीची टीईटी रद्द ! शाळा बंद - शिक्षक रस्त्यावर, मोर्चाने कलेक्टर ऑफिसवर धडक !!भ्रम फोडणारा समाजच खरी संस्कृती निर्माण करतो – डॉ. गणेश देवीटीईटीच्या सक्तीविषयी खासदार धैर्यशील मानेंनी वेधले लोकसभेत लक्षकोल्हापुरात महापालिका शाळेत साकारली स्मार्ट हॅपी क्लासरुम

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान

schedule16 Oct 24 person by visibility 523 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप संस्थेमधील दहा शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ च्या वतीने बिल्डर्स ऑफ नेशन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 
 रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत म्हणाल्या की, “ आजघडीला समाजामध्ये एका बाजूला प्रत्येक जण आपल्या जीवनात, स्वतः साठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसं मात्र इतरांसाठी जगत आहेत. आणि अशी माणसं म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभ आहेत. दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सतत सेवारत असणाऱ्या हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप संस्थेमधील अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी ही अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहेहू”.
 हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप  संस्थेतील शिक्षक देवानंद भाडळे, अंजना लागस, मिलिंद गुरव, सचिन वसावे , मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, मुग्धा गोरे-लिंगनूरकर,  मनोज शेडगे, संजीवनी कोळी, विभावरी सावंत व संदीप मोरे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला  डॉ. ममता बियाणी, निलाभ केडिया, निकेत दोशी, निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका आदी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes