Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सध्याच्या युगात वाचकांचे प्रबोधन करणारी पत्रकारिता गरजेची- लक्ष्मीकांत देशमुखछोट्या गावातील मुलीची मोठी स्वप्नं, बाई तुझ्यापायी नवीन वेबसिरीजमहापालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडतडाॅ. बापूजी साळुंखे इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदगुजरीतील छोटे दुकान ते शिरोलीत दागिने उत्पादन कारखानामाजी नगरसेवक रमेश पोवार लवकरच शिवसेनेत ! आबिटकर, क्षीरसागरांच्या उपस्थितीत होणार प्रवेशखासदार निलेश लंकेच्या पुढाकारातून रविवारी भुदरगड स्वच्छता मोहीमशाश्वत प्रतिष्ठानतर्फे वारी परिवारचे स्वागतसोमवारी कोल्हापुरातील सी - डी वार्डातील पाणीपुरवठा बंदशहीद महाविद्यालयात रंगला यूथ फेस्टिव्हलमधील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा

जाहिरात

 

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद

schedule16 Oct 24 person by visibility 566 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे १९ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘केएमए-कॉन २०२४’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. यावर्षीच्या परिषदेचे ब्रीदवाक्य ‘ डॉक्टर बियाँड मेडिसीन ३६० डिग्री’असे आहे. या अंतर्गत डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवांपलिकडे असलेल्या विस्तारित भूमिकांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.’असे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर व परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपक जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या परिषदेत ५०० हून अधिक डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.
हॉटेल सयाजी येथे हे दोन दिवसीय परिषद होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी डॉ. शरद भुथाडिया यांचा सत्कार करण्यात येणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी ‘डॉक्टरांनी दैनंदिन जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जायचे,आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर, एकात्मिक आरोग्य सेवा कशी द्यावी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वजन नियोजन, डॉक्टरांसाठी आर्थिक नियोजन अशा विविध विषयावर मार्गदर्शन सत्रे होतील. कार्डिओलॉजिस्ट सुनील साठे, मिरज येथील डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. तेजस कुलकर्णी, डॉ. ममता लाला हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला केएएमचे उपाध्यक्ष डॉ. ए. बी. जाधव, डॉ. आर. एम. कुलकर्णी, केएमएचे मानद सचिव डॉ. शीतल देसाई, परिषदेच्या आयोजन सचिव डॉ. सरोज शिंदे, परिषदेच्या सहअध्यक्षा डॉ. अर्चना पवार, डॉ. प्रविण नाईक, डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. आशा जाधव, डॉ. कृष्णा केळवकर, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. सुर्यकांत मस्कर, डॉ. महावीर मिठारी, डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes