Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रहिवासाचा कोणताही पुरावा ग्राह्य धरा : माजी नगरसेवकांची आयुक्तांच्याकडे मागणी महापालिकेची अंतिम मतदार यादी पुन्हा लांबणीवर, 15 डिसेंबरला यादी जाहीर होणार खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन, संचमान्यतेतील त्रुटी दूर कराशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदलीकोल्हापूर प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा ! प्रस्ताव सरकारकडे सादर ! !यसबा बाल मित्र पुरस्कार प्रा. प्रज्ञा गिरी, आशिष घेवडे यांना जाहीरशिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनआधुनिक तंत्रज्ञानाने आरोग्य सेवा दर्जेदार करणे ही काळाची गरज- डॉ.चंद्रशेखर बिरादरनूतन मराठीचा विद्यार्थी गौरव पाटीलला राष्ट्रीय शालेय कुस्तीमध्ये सुवर्णपदक

जाहिरात

 

ग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे

schedule18 Oct 24 person by visibility 449 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘ग्रंथ हे जगण्याची प्रेरणा देतात, दिशा दाखवतात. मार्गदर्शन करतात. ग्रंथसोबत ही जगण्यासाठी पूरक ठरते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ मोलाची भूमिका बजावतात’ असे मत पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. 
येथील करवीर नगर वाचन मंदिरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिना’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी विविध लेखक, साहित्यिक त्यांच्या साहित्यकृतींचा समाज आणि नागरिकांवर झालेला परिणाम याची उदाहरणे देत ग्रंथांचे महत्व विशद केले. 
 याप्रसंगी कनवातर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटामध्ये मेन राजाराम प्रशालेची विद्यार्थिनी पायल दिंगबरे हिने तर खुल्या गटात वृषाली कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ७५ हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिल्याबद्दल यावेळी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.
कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण साळाेखे, कार्यवाह अश्विनी वळिवडेकर, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या उपस्थितीत एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन गटामध्ये प्रांजल शहापूरकर, ऋचा तेंडुलकर आणि भक्ती उतरंडे यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. खुल्या गटात उत्तम तलवार, सुषमा पाटील, दीपक पाटील यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यावेळी संचालक डॉ .अमर आडके, चंद्रशेखर फडणीस, मंगेश राव, मनीषा वाडीकर, डॉ. विजय पाटणकर, मनीषा शेणई उपस्थित होत्या. विकास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes