+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule25 Jul 24 person by visibility 1696 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी  मीना शेंडकर यांनी केले आहे.  
शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागकारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.  
शिक्षण सप्ताहाचे उपक्रमातंर्गत २६ जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, २७ जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस व २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस राबविण्यात येणार आहेत. 
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व योजना या तीनही विभागांच्या समन्वयातून शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. 
आजअखेर अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस  शाळांमध्ये उत्साहात  करण्यात आले. पुढील तीन दिवसांमध्ये कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब उपक्रम/ शालेय पोषण दिवस व समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवणेच्या सूचना असल्या तरी इतर सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाची कार्यवाही सुरु आहे. शिक्षण सप्ताह अंतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांची छायाचित्रे, माहिती http://shikshasaptah.com / shiksha -saptah या लिकवर अपलोड करावे.